सातारा : अज्ञात चोरट्याने सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 26 जुलै रोजी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गोडोली नाका येथून गजानन हरी जाधव राहणार पिरवाडी सातारा यांचे हँडल लॉक केलेली मोटरसायकल क्र. एमएच 11 सीयु 6911 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.
दुसऱ्या घटनेत राधिका नगर, सातारा येथील विकास मारुती कदम यांची घरासमोर लावलेली दुचाकी क्र. एमएच 11 बीएन 7193 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी
by Team Satara Today | published on : 30 July 2023

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा