सातारा : पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात सातारा सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, क्रेडीट कार्डची मागणी व वेळोवेळी पैसे घेवून जाचहाट केल्याप्रकरणी पती प्रशांत श्रीकांत सावंत (वय 30, रा.खोकडवाडी ता.सातारा) याच्या विरुध्द सातारा सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी वर्षा काशिनाथ बडदरे (रा.सारखळ ता.सातारा) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 2019 पासून ऑक्टोबर 2024 वेळोवेळी पतीने मानसिक त्रास दिला आहे. तक्रारदार या सरकारी नोकरदार आहेत.
पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा
by Team Satara Today | published on : 03 December 2024