सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी चार जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हर्षा प्रशांत लोंढे रा. खेड, सातारा यांना मारहाण केल्याप्रकरणी पती प्रशांत शिवाजी लोंढे, सासू मंजुळा शिवाजी लोंढे, सासरे शिवाजी रामभाऊ लोंढे, दीर महेश शिवाजी लोंढे यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार माने करीत आहेत.