अपघातात जखमी झालेल्याचा मृत्यू

by Team Satara Today | published on : 30 July 2023


सातारा : अपघातात जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तुषार साहेबराव ढेरे रा. कवठे, ता. वाई हे पायी चालत निघालेले असताना पाठीमागून आलेल्या एका मोटरसायकलस्वाराने त्यांना भरधाव वेगात येऊन धडक दिल्याने त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार टकले करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मुला-मुली सह विवाहिता बेपत्ता
पुढील बातमी
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी

संबंधित बातम्या