सातारा : सातारा शहरासह तालुका हद्दीत बेकायदा दारु विक्री केल्याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात दोनजणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सातार्यातील गुरुवार परज येथे बाबू पांडूरंग पवार (वय 65, रा. शाहूपुरी) याच्या विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 1050 रुपये किंमतीच्या 15 दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
दुसरी कारवाई परळी ता.सातारा येथे बेकायदा दारु विक्री केल्याप्रकरणी महिलेवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी महिलेकडून 15500 रुपये किंमतीच्या 117 दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.