सातारा : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले. सातारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉ अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यात सुद्धा विविध ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आले आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि "चाय पार्टी " करणाऱ्या इतर खासदारांचा निषेध करण्यात आला.
१२ मार्च २०२६ रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्पीय बजेट चालू असताना मकर प्रवेशद्वारच्या बाहेर काँग्रेस नेते खा. राहुल गांधी व काँग्रेस तसेच अन्य विरोधी पक्षातील जवळपास २० खासदारांनी चहा-बिस्कीट बरोबर 'चायपार्टी' आयोजित करणे ही अत्यंत बेजवाबदार, खेदजनक व आक्षेपार्ह बाब आहे. संसद ही आपल्या देशाची सर्वोच्च लोकतंत्र संस्था आहे, त्याची प्रतिष्ठा व मर्यादा राखणे ही प्रत्येक लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. परंतु या घटनेच्या माध्यमातून संसद परिसरात एकप्रकारे 'पार्लमेंट पिकनिक स्पॉट' बनविण्याचे विरोधकांकडून प्रयत्न करण्यात आले. यावेळी देशात घरगुती गॅसची कथित टंचाई असल्याचा भ्रम सर्वत्र पसरविण्याचे कटकारस्थान काँग्रेसने केले. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार देशाच्या प्रत्येक नागरिकाला ऊर्जा सुविधा पुरविण्याकरिता वचनबध्द होऊन सातत्याने काम करीत आहे.
त्यामुळे संसदेच्या दारात चाय पार्टी करणाऱ्या काँग्रेस व सहयोगी खासदारांविरोधात आज साताऱ्यात पोवई नाका परिसरात आंदोलन करून निषेध करण्यात आला.
यावेळी सातारा नगरपालिका आरोग्य समिती सभापती धनंजय जांभळे, नियोजन समिती सभापती अशोक शेडगे, नगरसेविका प्राची शहाणे, नगरसेविका अर्चना कांबळे, नगरसेविका रीना भणगे, मंडल अध्यक्ष वैशाली टंगसाळे, मंडल अध्यक्ष अविनाश खर्शीकर, भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस विकास गोसावी, जिल्हा उपाध्यक्ष विक्रांत भोसले , राहुल शिवनामे, रेणू येळगावकर, विजय काटवटे, जिल्हा संवादक प्रवीण शहाणे, युवा मोर्चाचे चिन्मय कुलकर्णी , अमोल कांबळे, सुनिषा शहा , सुचारीता कंडारकर, अंजली त्रिंबके, शुभदा महाबळेश्वरकर, सीता चव्हाण , कल्पना जाधव, अमोल टंगसाळे , विक्रम बोराटे , सचिन कांबळे , मनोहर वडलिक, महेश गोंदकर, अमित भिसे, रवी आपटे, दिनेश चोरगे, प्रशांत जाधव, संजय कोरे, रोहित किर्दत, अक्षय चांगण, श्रीधर हादगे , प्रथमेश इनामदार, प्रथमेश मोरे , राहुल राठोड ,अरविद चव्हाण, जतिन वाघमारे, सोमनाथ शिंदे, शशांक अंबिकर ,अथर्व वडलीक आणि कार्यकर्ते , पदाधिकारी उपस्थित होते.