सातारा : शिवराज पेट्रोल पंपाजवळ असलेल्या शिक्षक कॉलनी संभाजीनगर येथून २७ वर्षीय तरुणीने लॅपटॉपची चोरी केल्याची घटना घडली आहे. याबाबतचा गुन्हा सातारा शहर पोलिसांत दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, नामदेव मारुती तरडे यांच्या घरी भाड्याने राहत असलेल्या अक्षदा जीवन पवार (वय २७) हिच्या विरोधात पत्रकार मुकुंद रामचंद्र काकडे (वय ५५ वर्ष) फिर्याद यांनी दिली आहे. काकडे हे त्यांचे सासरे अंकुशराव साळुंखे यांच्या घरी कुटुंबासोबत राहात असताना दि. २५ फेब्रुवारी २०२४ रोजी तसेच एप्रिल २०२५ या दरम्यानच्या काळात व दि. १० मार्च २०२६ च्या काळात २६,५०० व ३० हजार रुपये किमतीचा डेल कंपनीचा लॅपटॉप चोरून नेला आहे.