सातारा : शहरातील हॉटेल फर्न परिसरात शुक्रवारी (दि. ६) रात्री सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. उसाने भरलेल्या ट्रॉलीला पाठीमागून भरधाव ट्रकने धडक दिल्याने हा अपघात घडला.
या धडकेत ट्रक तसेच उसाची ट्रॉली यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ट्रॉलीतील उस रस्त्यावर विखुरला गेला. अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत करून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, सदर घटनेची नोंद उशिरापर्यंत सातारा शहर पोलीस ठाण्यात झालेली नव्हती. अपघातामुळे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. वाहतूक सर्व्हिस रोडने वळवली होती.