सातारा : गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 रोजी पार्थ राजेंद्र भिलारे रा. कारंडवाडी, ता. सातारा सध्या रा. अमरलक्ष्मी, सातारा या युवकाने जानाई मळाई डोंगराच्या पायथा परिसरात असणाऱ्या जांभळीच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार खाडे करीत आहेत.