सातारच्या खेळाडूंची  राज्यस्तरावर स्पर्धेसाठी  निवड

by Team Satara Today | published on : 19 September 2024


सातारा : केंद्र शासनाच्या वतीने खेलो इंडीया ही योजना प्रतिभावंत खेळाडु तयार व्हावेत म्हणुन देशभर राबविली जाते. जिल्हा क्रिडाधिकारी कार्यालयाच्या वतीने या योजनेर्तंगत जिल्हा खेलो इंडिया ॲथलेटिक्स प्रशिक्षण केंद्र श्रीमंत छत्रपती शाहु क्रिडा संकुल सातारा येथे सुरु आहे.

जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने दिनांक ४ व ५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत घेण्यात आलेल्या जिल्हास्तर मैदानी स्पर्धेत जिल्हास्तर खेलो इंडिया अँथलेटिक्स प्रशिक्षण केंद्राचे  खेळाडू सहभागी होऊन पुणे बालेवाडी येथे ११ खेळाडुचीं राज्यस्तर ॲथलेटिक्स सपर्धेसाठी निवड झाली आहे.

राज्यस्तर मैदानी क्रीडा स्पर्धेकरीता निवड झालेल्या खेळाडूंचे नितीन तारळकर, जिल्हा क्रिडा अधिकारी सातारा यांनी अभिनंदन करून, राज्यस्तर स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा मेगा फूड पार्क येथे २० सप्टेंबर रोजी अप्रेन्टिस योजना जनजागृती कार्यशाळेचे आयोजन
पुढील बातमी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव

संबंधित बातम्या