सातारा : सातारा शहर परिसरातील एका अल्पवयीन मुलाचे अज्ञाताने अपहरण केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातार्यातील कृष्णानगर येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अज्ञाताने अपहरण केले. ही घटना 29 सप्टेबर रोजी घडली असून मुलाच्या आईने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.