सातारा : गोडोली सातारा येथील संजय हनुमंत वडार (रा. साईनगर) यांच्या नावाने नीरा ता. पुरंदर येथील दत्त मागासवर्गीय मजूर सहकारी संस्थेच्या सभासदत्वाचा फायदा घेऊन त्यांच्या नावावर अनेक खोटे व्यवहार करण्यात आले आहेत. या व्यवहारात खोटे अंगठे उठवून ही व्यवहार झाल्याची माहिती आहे. या विरोधात वडार यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पुरंदर यांच्याकडे दाद मागितली आहे.
या तक्रार पत्रात नमूद आहे की, वडार हे या संस्थेचे 1996 सालापासून सभासद आहेत. मात्र, त्यांच्या नावावर त्यांना कोणतीही कल्पना न देता अनेक व्यवहार त्यांचे खोटे आमचे उठवून करण्यात आल्याची माहिती आहे. संस्थेचे चेअरमन दिलीप हनुमंत धोत्रे यांनी स्वतःहून हे तक्रारदारांना न विचारता परस्पर केले आहेत. माझ्या अंगठ्याची फॉरेन्सिक तपासणी करून ते अंगठे अनेक कागदपत्रांवरील अंगठ्याच्या शिक्याशी जुळतात का याची खातर जमा करावी आणि संबंधितांवर त्वरित गुन्हा दाखल करून आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या दालनासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा तक्रारदार संजय धोत्रे यांनी दिला आहे.