पाल गटात शरद पवारांच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला, भाजप उमदेवाराच्या भावाने केली मारहाण

by Team Satara Today | published on : 07 February 2026


सातारा : सातारा जिल्ह्यात निवडणुकीला गालबोट लावणारी घटना घडली आहे. जिल्हा परिषदेच्या पाल गटात भाजप उमेदवाराच्या भावाने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण केली. हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले, तेव्हा दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. 

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे उमेदवार माधवराव काळभोर यांच्या भावाने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे पदाधिकारी बाळासाहेब साळुंखे चोरेकर यांना मारहाण केली.  बाळासाहेब साळुंखे चोरेकर हे देवदर्शनावरून परत येत होते, त्याचवेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. बाळासाहेब साळुंखे चोरेकर यांनी सांगितले की, हल्लेखोर इनोव्हा गाडीतून आले होते. त्यांनी आमची गाडी अडवली आणि मारहाण केली. 

पाल जिल्हा परिषद गटातील वर्चस्वावरून हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. चोरेकर यांना मारहाण झाल्याची माहिती कळताच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उंब्रज पोलीस ठाण्यात दाखल झाले.  राष्ट्रवादीचे उमेदवार देवराज पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे पुतणे सागर पाटील यांनीही पोलीस ठाण्यात धाव घेतली. या घटनेमुळे तणाव निर्माण झाला. ७ फेब्रुवारी रोजी मतदान असताना या घटनेमुळे पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
माता रमाई आंबेडकर आदर्श स्त्रीत्वाच्या प्रतीक - यशेंद्र क्षीरसागर; सौ. लक्ष्मीबाई पाटील वसतिगृहामध्ये जयंतीनिमित्त विद्यार्थिनींना मार्गदर्शन
पुढील बातमी
कोडोलीत लोकशाहीचा आदर्श : लग्नसोहळा, दुःखद प्रसंग आणि मतदान - तिन्ही कर्तव्ये पाडली पार

संबंधित बातम्या