सातारा : शिक्षण प्रसारक संस्था करंजेपेठ सातारा संचलित श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजेपेठ साताराच्यावतीने संस्थेचे सचिव तुषार पाटील यांच्या संकल्पनेतून ग्रामस्वच्छता अभियान संपन्न झाले..सदर ग्रामस्वच्छता अभियानासाठी विद्यालयातील इयत्ता ९ वी अ, ब, क च्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला.
अभियानाच्या प्रारंभी संस्था सचिव तुषार पाटील यांनी ग्रामस्वच्छतेचे महत्व पटवून दिले व प्लास्टिकमुक्तीसाठी संस्थेने व शाळेने केलेल्या उपाययोजनांची माहिती देऊन संस्थेने सुरु केलेल्या "जीवन कौशल्य विकास" या विषया अंतर्गत राबविण्यात येणा-या उपक्रमांचीही माहिती दिली..
प्रत्यक्ष ग्रामस्वच्छता अभियानात मुला मुलींना म्हसवे ग्रामस्थानांचेही विशेष सहकार्य लाभले. ग्रामस्वच्छता झाल्यानंतर विद्यालयाचे माजी विद्यार्थी संदीप शेलार आणि ग्रामस्थांच्या वतीने विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला...
विद्यार्थ्यांनी ग्रामस्वच्छता अभियानात हिरीरीने सहभाग घेतल्याबद्धल माजी उपसरपंच रमेश शेलार यांनी त्यांचे कौतुक केले. तेव्हा सरपंच मनीषा दीक्षित, संदीप शेलार तर विद्यालयाच्या वतीने सुनीता देशमुख, वृषाली कुंभार, उषा नागरे, सुशांत साळुंखे, रणजित केंजळे व यशवंत गायकवाड उपस्थित होते.