सातारा एमआयडीसीतील ट्रक टर्मिनसला 'स्व. अभयसिंहराजे भोसले' यांचे नाव देण्याची मागणी

सातारा जिल्हा वाहतूक संघटनेचे अधिकाऱ्यांना निवेदन

by Team Satara Today | published on : 10 March 2026


सातारा :  जिल्हा ट्रान्सपोर्ट माल व प्रवासी वाहतूक असोसिएशन सातारा संघटनेची अनेक वर्षापासून सातारा मध्ये आवश्यक सुविधासह ट्रक टर्मिनल व्हावे ही मागणी होती. संघटनेच्या या मागणीला माननीय नामदार श्री. छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी न्याय दिला सातारा येथील जुन्या औद्योगिक वसाहती मधील जागा ट्रक टर्मिनल साठी मंजूर करून दिली तसेच ट्रक मालक चालक यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधा पुरवल्याबद्दल संघटनेने आभार मानले आहे.

​संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे की सहकार महर्षी मा. ना. श्री. छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांची धडाडी आणि सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी घ्यायचा पुढाकार. वाहतूकदारांचे प्रश्न सोडवून वेळोवेळी या कष्टकरी वर्गाला दिलासा दिला होता, त्यांची आठवण आमच्या मनात कायम आहे त्यामुळे सातारा एमआयडीसी सर्व सोयीसुविधासह सुसज्ज अशा ट्रक टर्मिनल ला सहकार महर्षी माननीय नामदार श्री.छत्रपती अभयसिंहराजे भोसले ट्रक टर्मिनल असे नाव द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

​हे निवेदन जिल्हा ट्रान्सपोर्ट माल व प्रवासी वाहतूक असोसिएशन सातारा अध्यक्ष प्रकाश गवळी तर्फे माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य व डॉ. अमित कुमार सुरेखार्जुन सोंडगे मा. प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी सातारा यांना दिले यावेळी अक्षय गवळी, रवी चव्हाण, असलमशेठ कुरेशी, निलेश शिंदे, पांडुरंग राजे, राहुल घाडगे, प्रमोद रोमन,सत्यवान किर्दत,महेश जाधव, धनंजय निकम,भरत साबळे, वैभव येवले,विकास साबळे इतर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वॉर्डबॉयचा शाळेतील २४ विद्यार्थ्यांवर अत्याचाराचा प्रयत्न
पुढील बातमी
लोणंदमध्ये आरटीई प्रवेशाचा घोळ ; बोगस कागदपत्रांच्या जोरावर नामांकित शाळांमध्ये प्रवेशाचा ‘खेळ’?

संबंधित बातम्या