गर्भाशय मुखाचा कॅन्सर टाळण्यासाठी मुलींना मोफत लसीकरण मोहिमेचे साताऱ्यात उद्घाटन; अत्यंत सुरक्षित उपाय

by Team Satara Today | published on : 10 March 2026


सातारा : महिलांमध्ये झपाटयाने वाढत असलेल्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर आळा घालण्यासाठी केंद्र शासनाने अत्यंत महत्वाचे पाऊल उचलले आहे. देशभरातील 14 वर्षे वयोगटातील मुलींसाठी ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (एच पी व्ही) लसीकरण मोहिम लवकरच राबविण्यात येत आहे. या अंतर्गत गार्डासिल ही लस मोफत देण्यात येणार आहे. तसेच ह्या लसीची मात्र फक्त एक डोसच आहे.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दि 28 फेब्रुवारी 2026 रोजी मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एच पी व्ही लसिकरण मोहिमेचा राष्ट्रीय शुभारंभ करण्यात आला. या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर,.आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकरयांच्या मार्गदर्शनाखाली दि 8 मार्च 2026 रोजी, महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्यात शुभारंभ करण्यात आला.

त्याच प्रमाणे दि. 08 मार्च 2026 महिला दिनाचे औचित्य साधून सातारा जिल्हयातील या मोहिमेचा शुभारंभ संतोष पाटील, जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करणेत आला. त्या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे,जि प सातारा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे, व  अधिकारी यांच्या उपस्थीतीत करणेत आला.

मोहिमेच्या अनुषगांने एच पी व्ही लसीकरण 14 वर्षे वयोगटातील (ज्यांनी 14 वर्षे पुर्ण केलेली आहेत व 15 वर्षे पुर्ण केलेली नाहीत) मुलींना देण्यात येईल. मोहिम सुरु झाल्या नंतर पुढील 90 दिवसांच्या कालवधीत 15 वर्षे पुर्ण होणा-या मुली देखील या तीन महिन्यांच्या एच पी व्ही लसिकरण मोहिमेस पात्र राहतील. एकूण लोसंख्येच्या 1 % लाभार्थी हे मोहिमेकरीता अपेक्षीत लाभार्थी असतील. या मोहिमेत विशेषता आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील कुटुंबाना दिलासा मिळणार आहे. 

एच पी व्ही लसिकरण पूर्णपणे ऐच्छिक आहे आणि मुलींच्या लसिकरणापूर्वी पालकांची संमती घेणे अनिवार्य आहे. U-WIN पोर्टलवर डिजिटल संमती घेता येईल. इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्यास निर्धारित नमुन्यात हार्ड कॉपीवर संमती घेण्यात येणार आहे. ही लस शासकिय रुग्णालय जसे सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी मोफत उपलब्ध देणेत येणार आहे.

केंद्र व राज्या शासनाच्या मार्गदर्शक सुचनां नुसार महाराष्ट्र राज्यात एच पी व्ही लसिकरण मोहिम राबवण्यात येत आहे. या मध्ये 14 वर्षीय मुलींना ही लस शासकिय रुग्णालया मध्ये मोफत देणेत येणार आहे. तरी सर्व पात्र लार्थीनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीम याशनी नागराजन यांनी केले आहे. 

एच पी व्ही लसिकरण हे गर्भाशयाचा कॅन्सर टाळण्यासाठी अत्यंत सुरक्षित उपाय आहे. किशोर वयात लस घेतल्यास भविष्यात या कर्करोगाचा धोका कमी करता येतो. तरी 14 वर्ष वयोगटातील मुलींच्या पालकांनी त्यांच्या मुलींना हे लसिकरण करुन घ्यावे, असे आवाहन  संतोष पाटील यांनी केले आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
हल्लेखोरांना कडक शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न करणार ; संपर्कप्रमुख रेश्मा जगताप यांचे आश्वासन, माजी सैनिकाच्या कुटुबियांचे चितळीत सांत्वन
पुढील बातमी
एमआयडीसी मधील ट्रक टर्मिनसला स्व. अभयसिंहराजे यांचे नाव द्यावे - ट्रक चालक-मालक संघटनेचे एमआयडीसी अधिकाऱ्यांना निवेदन

संबंधित बातम्या