ॲमेझॉन प्राइम व्हिडिओच्या लोकप्रिय वेब सीरिज ‘मिर्झापूर’चा तिसरा सीझन या वर्षी जुलैमध्ये रिलीज झाला होता. तिसऱ्या हप्त्यात मुन्ना भैया उर्फ दिव्येंदू शर्माच्या अनुपस्थितीमुळे चाहते खूपच निराश झाले होते. मात्र, काही काळापूर्वी दिव्येंदूने तो ‘मिर्झापूर’ चित्रपट घेऊन येत असल्याचे सांगितले होते. या बातमीने चाहत्यांच्या आनंदाला सीमाच उरली नाही. आता अभिनेत्याने या चित्रपटाशी संबंधित काही अपडेट्स शेअर केले आहेत. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आणि वेब सिरीजपेक्षा किती वेगळा असेल हे त्याने सांगितले आहे.
चित्रपटावर पहिली प्रतिक्रिया :
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिव्येंदू शर्मा IFFI (International Film Festival of India) मध्ये पोहोचले जेथे त्यांनी त्यांच्या आगामी ‘मिर्झापूर’ चित्रपटाबद्दल सांगितले आणि अपडेट्स शेअर केले आहेत. निर्माते मिर्झापूर वेब सिरीजच्या पात्रांवर आधारित चित्रपट बनवत आहेत हे कळल्यावर त्यांनी कशी प्रतिक्रिया दिली तेही त्यांनी सांगितले. दिव्येंदूने संभाषणात सांगितले की, ‘जेव्हा निर्मात्यांना कल्पना आली की मिर्झापूर या वेब सीरिजवर चित्रपट बनवावा, तेव्हा मला खूप आनंद झाला पण जेव्हा आम्ही घोषणा व्हिडिओ शूट केला तेव्हा मजा आली.’ असे ते म्हणाले.
पुढे अभिनेता म्हणाला की, ‘माझ्यासाठी ते लार्जर दॅन लाइफ होतं आणि खरं सांगायचं तर, त्यावेळी पहिल्यांदा मी स्वार्थीपणामुळे आनंदी नव्हतो. मी माझे चाहते, अनुयायी आणि मित्रांसाठी आनंदी होतो. ते सर्व या वेब सिरीज आणि त्यातील पात्रांशी निगडित आहेत.’ अभिनेता पुढे म्हणाला, ‘मी फक्त एवढेच सांगू शकतो की हा चित्रपट मिर्झापूर काळातील असेल आणि त्यात एक जबरदस्त मजेदार राइड पाहायला मिळेल.’ चित्रपटामधील या गोष्टीचा खुलासा अभिनेत्याने केला.
प्रेक्षकांना किती दिवस वाट पाहावी लागणार?
मिर्झापूर चित्रपटाच्या शूटिंगबाबत अपडेट देताना दिव्येंदू शर्मा म्हणाले की, सध्या चाहत्यांना थोडी वाट पहावी लागेल कारण या चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी 2025 पासून सुरू होणार आहे. तो पुढे म्हणाला, ‘पुढच्या वर्षीपासून आम्ही चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करू. संपूर्ण स्टारकास्टला एकाच ठिकाणी एकत्र आणणे हे मोठे आव्हान असेल.’
वेब सिरीजपेक्षा किती वेगळी असेल?
जेव्हा दिव्येंदू शर्मा यांना मिर्झापूर हा चित्रपट वेब सिरीजपेक्षा किती वेगळा असेल असे विचारण्यात आले तेव्हा त्यांनी उत्तर दिले की मिर्झापूरच्या पात्रांना या चित्रपटात खोलवर समजून घेण्याची संधी मिळेल. मिर्झापूरच्या दुनियेतील गँगस्टर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालताना दिसणार आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की मिर्झापूर या वेब सिरीजचे आतापर्यंत 3 सीझन आले आहेत. या मालिकेत अखंडानंद त्रिपाठी, बीना भाभी, मुन्ना भैया, गोलू आणि गुड्डू भैय्या या पात्रांनी खूप लोकप्रियता मिळवली आहे.
प्रजासत्ताक दिन तयारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या शहरातील विविध ठिकाणी भेटी |
साताऱ्यात दि. २६ रोजी जयपूर फूट शिबिराचे आयोजन |
थोरले प्रतापसिंह हे काळाच्याही पुढे असणारे प्रजाहितदक्ष राजे होते |
संघर्षशील एन.डी. सरांना कृतिशील राहून आवाज उठवणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल |
जीवन परिवर्तनात पुस्तकांची भूमिका मोलाची |
भाजपचे सातारा शहरात सदस्यता नोंदणी अभियान |
जाचहाट प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
गोडोलीत 36 हजारांची घरफोडी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची अडीच लाखांची फसवणूक |
भाजपचे सातारा शहरात सदस्यता नोंदणी अभियान |
जाचहाट प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
गोडोलीत 36 हजारांची घरफोडी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची अडीच लाखांची फसवणूक |
अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
‘मानिनी जत्रा’ सारखे उपक्रम बचतगटांसाठी नवसंजीवनी |
आई, मी 1000 सूर्यनमस्कार पुर्ण केले..!’ |
डिजिटल नकाशे म्हणजे मालमत्तेचे वैध पुरावे |
जिल्ह्यात पुन्हा एकदा ''शंभूराज" |