सातारा : मारहाण प्रकरणी तीन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 5 रोजी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास सदर बाजार, मिलिटरी कॅन्टीन येथे गाडी पार्क करण्याच्या कारणावरून सचिन सुरेश शेलार रा. एकसळ, ता. कोरेगाव, जि. सातारा यांना लाकडी दांडक्याने व लोखंडी पाईपने मारहाण केल्याप्रकरणी गणेश उर्फ धनाजी दादासो कुर्लेकर, दादासो कुर्लेकर, गणेश ची आई (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार माने करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा