वडूज : माझी वसुंधरा अभियानामध्ये उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल महाराष्ट्र शासनातर्फे वरुड ग्रामपंचायतीला 50 लाखाचे बक्षीस मिळालेले आहे. अशी माहिती खटाव चे गटविकास अधिकारी योगेश कदम यांनी दिली. माझी वसुंधरा अभियानामध्ये मागील चार वर्षापासून वरुड ग्रामपंचायतीने सातत्याने उत्कृष्ट काम करत आल्याने यावर्षी महाराष्ट्र शासनाने दाखल घेऊन माझी वसुंधरा अभियानामध्ये वरुड ग्रामपंचायतीला 50 लाखाचे बक्षीस जाहीर झाले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी वेळोवेळी वरुड येथील मियावाकी जंगल, तलाव तसेच ग्रामपंचायत भेटी देऊन सविस्तर मार्गदर्शन करत असतात. त्यामध्ये "कार्बन क्रेडिट" या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले आहे.राहुल देसाई उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तत्कालीन गट विकास अधिकारी खटाव येथे कार्यरत असताना सदरचे वृक्ष लागवडीचे नियोजन करून कामकाज केले आहे, त्याचे फलित आज 50 लाख रुपये बक्षीस असे रूपाने मिळालेला आहे.
योगेश कदम गटविकास अधिकारी पंचायत समिती खटाव यांनी सुद्धा मागील सहा महिन्यापासून दर पंधरा दिवसांनी वरुड गावाला भेटी देऊन वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. तसेच अपूर्वा चव्हाण, नरेंद्र जगदाळे, माधव बोईनवाड विस्ताराधिकारी यांनी देखील विशेष प्रयत्न केले आहेत. त्याबद्दल वरील अधिकाऱ्याचे सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत कार्यकारी तसेच ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले आहे.