जुन्या वादातून कोडोलीत घरावार दगडफेक; मायलेकासह तिघे जखमी

by Team Satara Today | published on : 02 April 2026


सातारा: कोडोली येथील बौद्ध वस्ती परिसरात जुन्या वादातून सात जणांच्या टोळक्याने एका घरावर भीषण दगडफेक केल्याची घटना घडली. ३१ मार्च रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास झालेल्या या हल्ल्यात मायलेकासह एकूण तिघे जण जखमी झाले आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, कोडोली येथे राहणारे विकी रमाकांत उंबरे हे आपल्या घराच्या अंगणात मित्रांसोबत जेवण करत असताना अचानक सात जणांनी तिथे येऊन जुन्या भांडणाचे निमित्त काढून घरावर दगडफेक सुरू केली. या हल्ल्यात विकी उंबरे आणि त्यांच्या आई मथुरा उंबरे यांच्या डोक्याला दगड लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. तसेच त्यांचा मित्र सोमनाथ पवार यालाही संबंधित संशयितांनी दगड आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

​घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी विकी उंबरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सातारा शहर पोलीस ठाण्यात दादा पवार, जित्या सुर्वे, बबलू पार्टे, अनिकेत वलेकर, संदीप वलेकर, सिद्धार्थ महाडिक आणि पृथ्वीराज साळुंखे या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार पोतेकर या करत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
डॉ. ममता लांडे यांच्या धैर्याचे कौतुक; पित्यासाठी लेकीकडून किडनी दान ! विजय शिवतारे यांच्यावर शस्त्रक्रिया यशस्वी
पुढील बातमी
सातारा-रहीमतपूर रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

संबंधित बातम्या