तेजस्विनी पंडितने आईसाठी शेअर केली खास पोस्ट!

by Team Satara Today | published on : 03 October 2024


 मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित लवकरच आगामी चित्रपट ‘एक नंबर’ प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. तसेच अभिनेत्री या चित्रपटाच्या प्रोमोशन दरम्यान सतत सोशल मीडियावर सक्रिय दिसत आहे. तसेच अभिनेत्री चाहत्यांना वैयक्तिक आयुष्याबद्दलही चाहत्यांना माहिती देत असते. याचदरम्यान अभिनेत्रीने नुकतीच सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट पाहून चाहत्यांच्या मनात पुन्हा एकदा अभिनेत्री तेजस्विनी पंडितने स्थान मिळवले आहे.

 चाहत्यांची मन अभिनेत्रीने नव्याने जिंकली आहेत. तेजस्विनीने आईसाठी शेअर केली पोस्ट अभिनेत्रीने आपल्या आईबाबत एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीची आई ज्योती चांदेकर यांनी नवी कार विकत घेतली आहे. ते पाहून अभिनेत्रीला तिच्या आईचा अभिमान वाटत आहे. त्यांच्याच कामाच्या कष्टाची पावती म्हणून अभिनेत्रीने आईचे कौतुक कौतुक करणारी पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीने लिहिले की, ज्योती चांदेकर ५२ वर्षाची कारकीर्द. 

आजतागायत २०० पेक्षा जास्त पुरस्कार नावावर असणारी मोजक्या अभिनेत्रींपैकी एक! आणि मग माझी आई. आई ह्यासाठी नंतर कारण काही व्यक्तिमत्त्व ही कामासाठी आधी आणि घरच्यांसाठी नंतर बनलेली असतात. आई ने काम सुरु केलं तेंव्हा ती १२ वर्षांची होती. मग तिचं लग्न झालं तरी ‘तिने’ काम करणं सोडलं नाही. मग २ मुली झाल्या. आम्हाला सोबत घेऊन पण ‘ती’ काम करतच होती. मग मुली कमवायला लागल्या तरीही ‘ती’ काम करतच होती. आणि अजूनही ‘ती’ काम करतेच आहे.” असे लिहून अभिनेत्रीने पोस्ट शेअर केली.

 तसेच ती पुढे म्हणाली, ‘ह्या सगळ्या प्रवासात तिची एक तक्रार होती. खूप फिरले, बस ने , ट्रेन ने, लोकल गाड्यांनी, आधी बाबाने घेतलेल्या, मग लेकीने घेऊन दिलेल्या, मग काही काळ धैर्यच्या गाडीने प्रवास केला, आता मला माझी गाडी हवी आहे. आणि शेवटी ह्या हट्टी बाईने, माझ्या आईने वय वर्ष ६८ व्या वर्षी तिच्या कमाईची, स्वकष्टाची, स्वतःची गाडी घेतलीच.” असे लिहून अभिनेत्रीने तिच्या आईचे कौतुक आमी अभिमान वाटणारी पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी घेतली गाडी अभिनेत्री ज्योती चांदेकर ही मराठी इंडस्ट्रीमधील अत्यंत आघाडीची अभिनेत्री आहे. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये मालिकेमध्ये काम केले आहे. अभिनेत्रीच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. तसेच खूप कष्टानंतर कामानंतर अभिनेत्रीने स्वतःच्या कर्तृत्वावर नवी गाडी विकत घेतली आहे. अभिनेत्रीची मुलगी आणि महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने या गाडीची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अजित पवार यांनी महिलांसाठी 'शक्ती बॉक्स' ही नवीन योजना केली जाहीर
पुढील बातमी
प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्य वाडेकर महाराजांना अटक

संबंधित बातम्या