'ऑपरेशन सिंदूर' ची माहिती भारतीय लष्करातील गद्दार जवानांनी दिली पाकिस्तानला

by Team Satara Today | published on : 24 June 2025


नवी दिल्ली : भारतीय लष्कराने राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' ची माहिती भारतीय लष्करातील गद्दार जवानांनी पाकिस्तानला दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली.  पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी या दोघांनी हेरगिरी केली. गुरप्रीत सिंह आणि त्याचा साथीदार साहिल मसीह या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघांना मागील दोन महिन्यांत २ लाख रुपये मिळाले. ही रक्कम ऑनलाइन ट्रान्सफर करण्यात आली होती. ही रक्कम गुरप्रीतने त्याच्या साथीदार साहिलच्या बँक खात्यात जमा केली होती.

'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान गुरप्रीतने अनेक लष्करी तळांची माहिती आयएसआयला पाठवल्याचेही उघड झाले आहे. दुसरीकडे, न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवले आहे आणि त्यांना मंगळवारी पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल. एसएसपी मनिंदर सिंग म्हणाले की, जम्मू व्यतिरिक्त गुरप्रीत सिंहने दिल्ली कॅन्ट आणि मेरठ कॅन्टमध्येही आपले कर्तव्य बजावले आहे.

तो जवान बऱ्याच काळापासून आयएसआय एजंट राणा जावेदच्या संपर्कात असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याने राणा जावेदच्या माध्यमातून जम्मू तसेच दिल्ली, मेरठ आणि पंजाबमधील अनेक लष्करी तळांची माहिती आयएसआयला पुरवली आहे.

धालीवाल येथील रहिवासी गुरप्रीतचा राणा जावेदशी अर्जन नावाच्या गावातील ड्रग्ज तस्कराने संपर्क साधला होता. तो सध्या दुबईमध्ये राहतो. पोलिसांनी सांगितले की, अर्जनला लवकरच एलओसी जारी केला जाईल. अटक केलेल्या गुरप्रीत सिंगचे वडील गावातील गुरुद्वारा साहिबमध्ये सेवादार आहेत. दोन्ही आरोपी फतेहपूर तुरुंगात आहेत.

या प्रकरणाचे गांभीर्य पाहून इतर सुरक्षा संस्थांनीही अमृतसरमध्ये तळ ठोकला आहे. सोमवारी संध्याकाळी गुरप्रीत आणि साहिल यांची जेआयसी येथे चौकशी करण्यात आली. हेरगिरीचे हे प्रकरण केवळ एका व्यक्तीचे नाही तर ते एका मोठ्या नेटवर्कचा भाग असू शकते अशी शंका यंत्रणांना आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
चंद्रभागेत स्नानासाठी गेलेले पाच भाविक बुडाले
पुढील बातमी
अ‍ॅसिडिटी वाटतेय? ही लक्षणं हायटल हर्नियाची असू शकतात!

संबंधित बातम्या