सातारा : राहत्या घरातून एक विवाहिता बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरात वास्तव्यास असलेली 20 वर्षीय विवाहिता राहत्या घरातून बेपत्ता झाली आहे. ही घटना दि. 23 ऑगस्ट रोजी घडली आहे. महिलेच्या पतीने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.