सातारा : शेंद्रे ता. सातारा येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ दसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या गुरुवार दि. २ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. या समारंभास कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दरम्यान, सोनगाव-करंदोशी ता. जावली येथील अजिंक्यतारा-प्रतापगड उद्योगाच्या प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ दसऱ्याच्या मुहूर्तावर गुरुवार दि. २ रोजी दुपारी १ वाजता होणार आहे. या सोहळ्याला ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या दोन्ही समारंभास दोन्ही कारखान्याचे आजी, माजी पदाधिकारी व संचालक, विविध संस्थांचे आजी, माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व सभासद, शेतकरी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांनी केले आहे.
'सुरुची' येथे दसऱ्याच्या शुभेच्छा स्वीकारणार
विजयादशमी, दसरा सणानिमित्त राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले गुरुवार दि. २ रोजी सायंकाळी ६ वाजता 'सुरुची' कार्यालय सातारा येथे पारंपरिक पद्धतीने नागरिकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देणार आहेत आणि नागरिकांच्या शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत. तरी, दसऱ्यानिमित्त आयोजित या सोहळ्याला सातारा-जावली मतदारसंघातील सर्व आजी, माजी पदाधिकारी, सर्व आजी, माजी नगरसेवक, सर्व कार्यकर्ते आणि नागरिक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जनसंपर्क अधिकारी अमर मोकाशी यांनी केले आहे.