अजित जाधव राज्यस्तरीय युवा गौरव पुरस्काराने सन्मानित; विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान

by Team Satara Today | published on : 12 January 2026


सातारा : लावण्यास्विहा बहुद्देशीय सामाजिक शैक्षणिक संस्था व फिरोजभाई पठाण मित्र समूह यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ व युवा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा सातारा येथे धनलक्ष्मी मंगल कार्यालयामध्ये संपन्न झाला.विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे नगरसेविका सौ. पूनम निकम, नगरसेवक फिरोज पठाण, अभिनेत्री अनुश्री ढम, दैनिक ऐक्यच्या व्यवस्थापकीय संचालक शिवानी पळणीटकर, सौ. अश्विनी सुतार, सौ. नीता भोसले, धम्मशील सावंत रायगड, सौ रुपाली गुजर उपस्थित होते.

सुजन फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून थोर महापुरुषांची जयंती पुण्यतिथी, विचारांचा प्रचार व प्रसार, वाचन चळवळीच्या वृद्धीसाठी विविध उपक्रम, विविध स्मरणिका व काव्यसंग्रहाचे संपादन, सामाजिक, शैक्षणिक, विधायक, सांस्कृतिक , साहित्य याविविध क्षेत्रामध्ये वीस वर्षाहून अधिक काळ कार्य करीत आहेत या कृतिशील कार्याची दखल म्हणून त्यांचा राज्यस्तरीय युवा गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

या पुरस्कार सोहळ्यात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व शाल देऊन गौरव करण्यात आला. राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या कार्यकर्त्यांना व युवा पिढीतील प्रेरणादायी व्यक्तींना प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर पाहुणे, पुरस्कारार्थी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या मार्गदर्शनपर भाषणांनी उपस्थितांना नवी प्रेरणा दिली. कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे अध्यक्ष सौ प्रियंका ढम यांनी केले. सूत्रसंचालन तनिष्का जाधव यांनी केले.  आभार संस्थेचे उपाध्यक्ष मिलिंदा पवार यांनी मानले मानले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कल्याण डोंबिवली महापालिकेतील उमेदवारांकडून पैशांच्या पाकिटाचं वाटप; निवडणूक आयोग घटनास्थळी दाखल
पुढील बातमी
बरडचे सुपुत्र जवान नायक विकास गावडे यांना वीरमरण; आज सोमवारी होणार लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

संबंधित बातम्या