सातारा : बंदुकीचा धाक दाखवून खंडणी मागितल्या प्रकरणी एका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 2 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सोमनाथ अशोक साळुंखे रा. नेले, पोस्ट किडगाव, ता. सातारा यांना त्यांच्या राहत्या घरात येऊन बंदुकीचा धाक दाखवून 20 हजार रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी यश सुभाष साळुंखे रा. मोळाचा ओढा, सातारा याच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. काटकर करीत आहेत.