सातारा : शेतात काम करीत असताना एक विवाहिता बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 रोजी दुपारी दोन ते अडीच च्या दरम्यान असेय, कदलीपट्टी, सहरसा, राज्य बिहार. सध्या रा. लिंब, ता. सातारा येथील एक 23 वर्षीय विवाहिता शेतात काम करीत असताना कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कुमठेकर करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा