सातारा : सन २०१५ मध्ये अपंग ऎवजी दिव्यांग हा शब्द आला आहे.अर्थात,अद्वितीय क्षमता असलेली व्यक्त होय.त्यांना समाजमान्यता मिळवून देण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी प्रयत्न करावा.असे आवाहन बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांनी केले.
दिव्यांग दिनानिमित्त समता शिक्षण प्रसारक मंडळाच्या मुकबधीर व मतिमंद या दोन विद्यालयातर्फे दिव्यांग मुलांनी बनविलेल्या वस्तूंची विक्री येथील नगरपालिकेजवळील सार्वजनिक रस्त्यावर मोठ्या उत्साहात झाली. तेव्हा अनिल वीर बोलत होते.अध्यक्षस्थानी मुकबधीर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका हेमलता जगताप होत्या.यावेळी दुसरे उद्घाटक अद्विक एंटरप्रायजेसचे व्यवस्थापक शुभम इंगवले होते. किरण जगताप यांनी प्रास्ताविक केले.सुरेश जगताप यांनी आभार मानले.
सदरच्या वंचितचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खंडाईत,गणेश कारंडे,दिलीप तथा महेंद्र भोसले, रिपब्लिकन पार्टी आघाडीचे किशोर गाल्फाडे, राष्ट्रोत्सवचे ऍड.विलास वहागावकर, कार्यक्रमास मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक महेश पोतदार, बापू कांबळे,शहाजी सोनवणे, कैलास बचुटे,मुकबधीर विद्यालयातील ज्ञानेश्वर ढोले, शरद पलके, निलोफर सोनवणे, दोन्ही विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व अध्ययनार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.