सातारा : काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांपैकी एकाने आशिष नितीन शिंगटे यांच्या उजव्या पायावर काहीतरी टाकल्याने पॅन्टने पेट घेतला. यामुळे त्याचा पाय भाजून तो गंभीर जखमी झाल्याची फिर्याद त्याचे आजोबा दिलीप गुजाबा ढमाळ (वय ६५, रा. असवली, ता. खंडाळा) यांनी खंडाळा पोलीस ठाण्यात नोंदवली असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पँट पेटल्याने असवलीचा युवक पाय भाजून गंभीर जखमी
by Team Satara Today | published on : 30 October 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा