अल्पशा आजाराने सचिन श्रोत्री यांचे निधन

by Team Satara Today | published on : 31 January 2025


सातारा : सचिन देवीदास श्रोत्री (वय 52) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.

सचिन श्रोत्री यांचे शालेय शिक्षण अनंत इंग्लिश स्कूल येथे झाले होते. पहिल्यापासूनच खेळकर स्वभावाचे असल्याने त्यांचा मित्र परिवार मोठा होता. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची त्यांनी 26 वर्षे सेवा बजावली. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी, 2 बहिणी, मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनाची माहिती समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. डॉ. संदीप श्रोत्री हे त्यांचे सख्खे चुलत बंधू होत.सावडणे विधी रविवार दि. 2 रोजी कैलास स्मशानभूमी, संगम माहुली, सातारा येथे सकाळी 9 वाजता होणार आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मारहाण प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा
पुढील बातमी
कायमस्वरूपी करमाफी, लाईट, पाणी फुकट असलेले गाव मान्याचीवाडी

संबंधित बातम्या