सातारा : मारहाण प्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सुनील प्रकाश चव्हाण रा. तामजाईनगर, सातारा यांना उसने पैसे न दिल्याच्या कारणावरून लाकडी दांडक्याने तसेच वस्ताऱ्याने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी तेथीलच राजेंद्र गंगाराम पवार यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार बोडरे करीत आहेत.