सातारा : फलटण येथील ख्यातनाम उद्योजक, समाजसेवक श्रीमंत राजसिंहराजे आप्पासाहेब निंबाळकर तथा बंटीराजे खर्डेकर (वय ७९) मूळ रा. कोल्हापूर यांचे शनिवार दि. १२ रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. दिवंगत श्रीमंत दादाराजे खर्डेकर यांचे ते बंधू, आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे ते मामा तथा सासरे तर, श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांचे ते वडील होत. कोल्हापूर येथील सरलष्कर बहाद्दर घराण्याचे वंशज असलेल्या बंटीराजे खर्डेकर यांनी औद्योगिक क्षेत्रात मोठे योगदान दिले. त्यांच्या पश्चात पत्नी वैशालिनिराजे, मुलगा दिप्तीमानराजे, मुलगी वेदांतिकाराजे भोसले, जावई शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह सुन, नातवंडे असा परिवार आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सव समारोप उत्साहात साजरा
January 17, 2026
विषारी औषध प्राशन केल्याने महिलेचा मृत्यू
January 17, 2026
साताऱ्यात मंगळवार पेठेतून २१ वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची तक्रार
January 17, 2026
सातारा शहरात तीन दुकाने फोडून ७४ हजारांची रोकड लंपास
January 17, 2026