सातारा : पादचार्याला धडक देवून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात चारचाकी चालकाविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गांधीनगर, पो. काशीळ, ता. सातारा येथे महामार्गावरील कोल्हपूर ते पुणे मार्गीकेवर अज्ञात चारचाकीने नामदेव केशव तोडकर (वय 60) यांना धडक केली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना दि. 16 रोजी सकाळी 8 च्या सुमारास घडली. तोडकर हे मार्गावरुन पलिकडील बाजूने शासकीय दवाखान्यात पायी चालत निघाले होते. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र बबन इंगुळकर यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक निकम तपास करत आहेत.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
