रास्त भाव दुकानांसाठी 31 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करावेत - जिल्हाधिकारी संतोष पाटील

by Team Satara Today | published on : 31 December 2025


सातारा : सातारा जिल्हयातील  शिधापत्रक धारकांची होणारी गैरसोय दूर करण्याकरीता सध्याची रास्त भाव दुकाने कायम ठेवून आजमितीस रद्द असलेली, राजीनामा दिलेली, व लोकसंख्या वाढीमुळे द्यावयाची नवीन रास्त भाव दुकाने प्राधान्यक्रमानुसार मंजूर करण्यात येणार आहेत. तरी इच्छुकांनी संबंधित तहसिल कार्यालय, पुरवठा शाखा यांचेकडे संपर्क साधाया व विहीत मुदतीत आवश्यक त्या कागदपत्रांसह तहसिलदार यांच्याकडे 31 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

यामध्ये,  सातारा तालुका गावे ७,  शहरी ठिकाणे – ०१,  वाई  तालुका – गावे-१५,  कराड तालुका गावे- ५, महाबळेश्वर तालुका-४३, कोरेगाव तालुका -१३,  खटाव तालुका-११,  फलटण तालुका ५, पाटण तालुका-२२,  माण तालुका-४,  खंडाळा तालुका-७, जावली तालुका ८ अशा एकूण १३४ गावे ठिकाणांचा समावेश आहे. 

ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचतगट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महिलांच्या स्वयंसहाय्यता बचतगट व महिलांच्या सहकारी संस्था यांना प्राथम्य क्रमानुसार नवीन रास्त भाव दुकानाकरीता ज्यांना अर्ज करणेचे असतील, त्यांनी संबंधित तहसिल कार्यालय, पुरवठा शाखा यांच्याकडे संपर्क साधावा व विहीत मुदतीत आवश्यक त्या कागदपत्रांसह तहसिलदार यांचेकडे अर्ज सादर करावेत. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असेही कळविण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा परिषदेकडील यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजनेचा निधी तातडीने खर्च करावा - पालकमंत्री शंभूराज देसाई
पुढील बातमी
विश्वास पाटील यांनी दिला साहित्यिकांच्या स्मृतींना उजाळा; थोर साहित्यिक आणि महापुरुषांच्या स्मारकांना भेट देऊन अभिवादन

संबंधित बातम्या