सातारा : जिओ मोबाइल टॉवरच्या बॅटरीची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 12 ते 28 दरम्यान लिंब, ता. सातारा गावच्या हद्दीतील महामार्गाच्या जवळ असलेल्या जिओ टॉवर मधील बॅकअपसाठी बसवलेली 35 हजार रुपये किंमतीची बॅटरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कुमठेकर करीत आहेत.