सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी चार जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २५ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास समर्थ महेश जगदाळे (रा. कुमठे, ता. कोरेगाव, जि. सातारा) हा आपल्या मित्रांसमवेत चारभिंतीवरील एका कठड्यावर बसलेला असताना अस्मित काळे, वेदांत कदम व अन्य दोन अनोळखी (सर्व रा. सातारा) यांनी त्याला विनाकारण मारहाण केली. अधिक तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.