सातारा : शिवीगाळ दमदाटी प्रकरणी तीन जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जमिनीच्या वादातून दि. ५ रोजी दुपारी तीन व संध्याकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास गणेश सूर्यकांत काटकर (रा. रामाचा गोट, ता. सातारा) यांना शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी तेथीलच राजेंद्र सूर्यकांत शिंदे, प्रतीक राजेंद्र शिंदे, मोहसीन सरताज पटवेकर यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जगदाळे करीत आहेत.