सातारा : महिलेला शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दुचाकीवरुन निघालेल्या महिलेला थांबवून अटकाव करत शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी सर्जेराव कांबळे याच्या विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. ही घटना दि. 24 नोव्हेबर रोजी घडली आहे.
महिलेला शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 25 November 2024