12:56am | Oct 30, 2024 |
सातारा जिल्ह्यामध्ये आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये बहुतांश उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. दिनांक 29 रोजी म्हणजे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सुद्धा राजकीय शक्ती प्रदर्शनाचा जिल्ह्यातील दुसरा अंक सुद्धा लक्षवेधी ठरला. महायुतीमध्ये वाई विधानसभा मतदारसंघात मिठाचा खडा पडला आहे. शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी राजीनामा देत वाईमधून अपक्ष दंड थोपटले आहेत. त्यांनी आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह अर्ज भरला. विधानसभेच्या विकास कामांसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. महाविकास आघाडी कडून अरुणादेवी पिसाळ यांनी अर्ज भरल्यानंतर वाईमध्ये मकरंद पाटील विरुद्ध अरुणादेवी पिसाळ अशी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये जाधव हे खंडाळ्यातून टक्कर देणार असल्याने या तिरंगी लढतीविषयी विशेष उत्सुकता आहे.
सातार्यातून महाविकास आघाडी कडून सर्वात शेवटी उमेदवारी निश्चित झालेले शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमित कदम यांनी शिवसैनिकांसह फारसा गाजावाजा न करता अर्ज भरला आणि ही जनसामान्यांची चळवळ आहे, असे संबोधित करून सातार्यात रंगतदार लढत होईल, असे संकेत दिले.
माण-खटाव विधानसभा मतदारसंघात प्रभाकर घार्गे यांनी अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीच्या वतीने अर्ज भरला आहे. यावेळी आम्ही ठरले गटाचे सर्व नेतेमंडळी उपस्थित होती माघार घेतलेल्या प्रभाकर देशमुखांची तर विधानसभेसाठी उत्सुक असणार्या अनिल देसाई यांची सुद्धा उपस्थिती होती. प्रभाकर घार्गे यांनी पुन्हा एकदा माण-खटाव तालुक्यातील सर्व नेत्यांची मोट बांधल्याने जयकुमार गोरे यांना ते जोरदार आव्हान देतील, असे चित्र आहे.
आमदार शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून भव्यशक्ती प्रदर्शन करत अर्ज भरला. यावेळी महायुतीचे नरेंद्र पाटील अचानक शशिकांत शिंदे यांच्या ताफ्यात सामील झाल्याने एकच चर्चेचा विषय ठरला. शशिकांत शिंदे व नरेंद्र पाटील हे दोन्ही माथाडी नेते एकाच वाहनातून प्रांत कार्यालयाकडे रवाना झाले. नरेंद्र पाटील यांचीही उपस्थिती राजकीय वर्तुळात खळबळ माजवून गेली आहे. सातारा जिल्ह्यातील सैनिकांची मते आपण मिळवणार, असा ठाम विश्वास असलेले आणि लोकसभा निवडणूक लढवलेले माजी सैनिक प्रशांत कदम यांनी कराड दक्षिण मधून अर्ज भरला आहे.
कराड उत्तरचा २५ वर्षाचा बॅंकलाॅग पाचच वर्षात संपवू : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस |
मुंढे च्या सरपंच, सदस्यांचा राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश |
७ नोव्हेबर; नवनिर्माणाचे स्वप्न पेरणारा दिवस ! |
पृथ्वीराज चव्हाण यांचा थेट भेटीवर जोर |
जयंत पाटील यांनी साताऱ्यात घेतला मतदारसंघनिहाय आढावा |
अमित कदम यांच्या शिवसंवाद यात्रेचा परळी मध्ये झंझावात |
कोरेगावात बेबंदशाही ; विरोधात 'स्टेटस' ठेवले म्हणून हात मोडेपर्यंत झोडपले |
राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण बंधनकारक : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
कुरवली खुर्द वृध्दाश्रमातील वृद्धांनी केला शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प |
मनोज जरांगेंनी केला 'महायुती'चा करेक्ट कार्यक्रम : हेमंत पाटील |
शिरवळ येथे ७ लाख ८६ हजार रुपयांची बेकायदेशीर दारू जप्त |
कारमधून पाच लाखाचे दागिने चोरीस |
कारची कन्टेनरला धडक; एकाचा मृत्यू |
चौघांकडून युवकाला मारहाण |
जाचहाटप्रकरणी 4 जणांवर गुन्हा |
अमित कदम यांच्या शिवसंवाद यात्रेचा परळी मध्ये झंझावात |
कोरेगावात बेबंदशाही ; विरोधात 'स्टेटस' ठेवले म्हणून हात मोडेपर्यंत झोडपले |
राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण बंधनकारक : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
कुरवली खुर्द वृध्दाश्रमातील वृद्धांनी केला शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प |
मनोज जरांगेंनी केला 'महायुती'चा करेक्ट कार्यक्रम : हेमंत पाटील |
शिरवळ येथे ७ लाख ८६ हजार रुपयांची बेकायदेशीर दारू जप्त |
कारमधून पाच लाखाचे दागिने चोरीस |
कारची कन्टेनरला धडक; एकाचा मृत्यू |
चौघांकडून युवकाला मारहाण |
जाचहाटप्रकरणी 4 जणांवर गुन्हा |
आदेशाचा भंग प्रकरणी दोन युवकांवर कारवाई |
अतित येथे अवैध दारु प्रकरणी कारवाई |
कराड दक्षिणमधील जनता स्वाभिमान जपणार : आ. पृथ्वीराज चव्हाण |
सातारा शहरात आ. शिवेंद्रराजेंच्या पदयात्रांचा धडाका सुरु |
जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात 198 उमेदवारांपैकी 89 उमेदवारांची माघार |