बुद्धाचे विचार बाबासाहेबांनी संविधानामार्फत दिले : डॉ. जयश्री कांबळे; "धम्म आणि संविधान-मानव मुक्तीचा मार्ग" वर व्याख्यान

by Team Satara Today | published on : 04 March 2026


सातारा : एकाधिकारी, हुकूमशाही, झुंडशाही,राजेशाही आदींना छेद लोकशाहीने देशास दिली आहे. ती प्रस्थापीत करण्यासाठी बाबासाहेबांनी बुद्ध विचारांच्या माध्यमातून नैतिकतेला सर्वोच्च स्थान देऊन संविधान दिले आहे. असे प्रतिपादन आंबेडकर विचारवंत प्रा.डॉ.जयश्री कांबळे यांनी केले.

"धम्म आणि संविधान-मानव मुक्तीचा मार्ग" या विषयावर भारतीय धम्म संघ यांच्यावतीने येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सांस्कृतिक सभागृहात जाहीर धम्मदेसना डॉ. कांबळे यांनी दिली. तेव्हा त्यांनी विस्तृत अशी माहिती दिली. अध्यक्षस्थानी भारतीय धम्म संघाचे अध्यक्ष प्रा.अशोक चौकाककर होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत म्हणाले,"विश्वव्यापी तथागतांच्या विचाराचा जो बाबासाहेबांनी धम्म दिला आहे.त्याची चिरफाड कोण्ही करू नये.धम्मात कोण्ही घुसखोरी करीत असेल त्यास चिकित्सकपणे समर्पकपणे उत्तर दिली पाहिजेत. प्रचार-प्रसारार्थक भारतीय धम्म संघ काम प्रशंसनीय करीत आहे."

डॉ.जयश्री कांबळे म्हणाल्या,"धम्मासंबंधी बौद्ध साहित्य मोठ्या प्रमाणावर आहे. याउलट देशास मिळालेले संविधान व्यापक असल्याने इतर धर्मीयांमध्ये वस्तुस्थिती आढळुन येत आहे.भारत वगळून श्रीलंका या सारख्या देशात अराजकता आढळून येत आहे.आम्ही भारताचे लोक या न्यायाने स्वातंत्र्य,समता व बंधुता या मूल्यांचा समावेश बाबासाहेबांनी संविधानात केला आहे.त्यामुळे न्याय व्यवस्था चांगली आहे. समानता व समान संरक्षण आढळून येत आहे. कोणत्याही व्यक्तीला विनाकारण शिक्षा दिली जात नाही. संविधान व्यापक असल्याने न्याय, स्वातंत्र्य,समता यांमधून मानवमुक्ती द्वार खुले झाले आहे.त्यामुळेच जगामध्ये दिशादर्शकाचे काम संविधान भक्कमपणे करीत आहे.सर्वांना उत्तर घटनेत मोळू शकते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार मिळाला आहे. राज्यसंस्था सर्वोच्च असून त्याखाली धर्म येतात.राज्याचे श्रेष्ठत्व मान्य बुद्धांनी केले होते.नवनिर्मितीचे काम धम्मामुळे झाले आहे."

प्रा.चौकाककर म्हणाले, "धम्मानुसार आचरण व विचार भक्कम असतील तर क्रांति घडते.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर, १९५६ च्या धम्मक्रांतीने आपणास दिलेल्या विज्ञानवादी, लोकशाहीवादी आणि मानव कल्याणी धम्माचा प्रचार प्रसार करण्याच्या उद्देशाने ३० डिसेंबर २००१ रोजी 'भारतीय धम्म संघ' कार्यरत झाला आहे. सदर उद्देशपूर्तीच्या दृष्टीने संघाने विविध कार्यक्रम राबविलेले आहेत. संघाने प्रामुख्याने धम्मदेसनांचा अखंड उपक्रम राबविलेला असून आतापर्यंत २४९ धम्मदेसना संचलित केलेल्या आहेत. मानवी मुल्ये, धम्म संस्कृती आणि संविधानिक व्यवस्था समाज जीवनात रुजवण्याच्या दृष्टीने या धम्मदेसना अत्यंत मौलिक आहेत. माणूस प्रज्ञा,शील व करूणावान व्हावा,धम्मधर व्हावा आणि स्वयंप्रकाशित व्हावा. या हेतूने धम्माविषयी केलेले मार्गदर्शन म्हणजे धम्मदेसना होय. माणसाला जात,धर्म,लिंग किंवा वंशाच्या आधारे होणाऱ्या भेदभाव, गुलामगिरी, शोषण आणि अन्याय यातून पूर्णतः मुक्त करून सन्मानपूर्वक, समता आणि स्वातंत्र्य जगण्याचा अधिकार मिळवून देणे म्हणजे मानव मुक्ती होय. अर्थात मुलभूत मानवी हक्क अधिकाराची प्रत्येकास प्रतिष्ठेने अथवा सन्मानाने जगता येईल. अशी व्यवस्था बहाल करणे म्हणजे मानव मुक्ती होय. परंतू आज देशात सनातनी विचारधारा, संस्कृती आणि धर्माचा उदोउदो सूरू असल्याने धार्मिक उन्माद वाढला आहे. राजकीय नेते, पक्ष, संघटना सत्ता, संपत्ती पिपासू बनल्या आहेत. भांडवलदार हे देशातील नागरीकांचे शोषक झाले आहेत. यामुळे भारतीय लोकशाही व्यवस्थेत एकाधिकारशाही नि, हुकुमशाही आली आहे. परीणामी नागरीकांना प्रगती, विकास, आनंद आणि समाधान देणारे मुक्त जीवन दुरापास्त झाले आहे. खरेतर धम्म हाच भारतीय संविधानाचा गाभा आहे. यामुळेच धम्म आणि भारतीय संविधान समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही मानवी मुल्ये बहाल करून आपणाला बंधमुक्त, गुलामगिरी मुक्त आणि शोषण मुक्त जीवन बहाल करतात. म्हणूनच प्रत्येक भारतीय नागरीकाने आपल्या दैनदिन व्यवहारीक जीवनात धम्माचे आचरण करून संविधानिक व्यवस्था दृढ करण्याची जबाबदारी उचलली पाहिजे. विज्ञानवाद आणि बुद्धिप्रामाण्यवादाने सर्वांगीण भ्रष्टाचारी व्यवस्था नष्ट करून मानव कल्याणी व्यवस्था अंगिकारीली पाहिजे. हाच मानव मुक्तीचा मार्ग आहे. ३० डिसेंबर २०२६ पर्यंत भारतीय धम्म संघाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या औचित्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात आणि विविध राज्यात धम्मदेसनांचे आयोजन केले जात आहे."

संयोजक म्हणून लुम्बिनी संघाचे संस्थापक डॉ.गोरख बनसोडे यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष डॉ.चंद्रकांत कुरणे यांनी प्रास्ताविक केले. स्मिता सम्यक व बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांनी सूत्रसंचालन केले. संयोजक संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष इंजि.रमेश इंजे संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेत आभारप्रदर्शन केले.

प्रथमतः डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास प्रा.अशोक चौकाककर व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.मंचावर बुद्धांच्या मूर्तीस पुष्पहार डॉ. जयश्री कांबळे यांच्या हस्ते अर्पन करून सर्वच उपस्थित मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले.शाहीर श्रीरंग रणदिवे यांनी संविधान व धम्म गीते सादर केली. 

कार्यक्रमास प्रसाद येवले, प्रणाली चौकाककर, प्रा. रमेश म्हस्के, प्राचार्य रमेश जाधव, दिलीप भोसले, बाळासाहेब सावंत, सुवर्णा कुरने,विवेक म्हस्के, वामन म्हस्के, मधुसूदन काळे, चंद्रकांत म्हस्के,भरत कीर्तिकर, प्रसाद गायकवाड,निर्मला विलासराव कांबळे, रामदास वाघमारे, गणेश कारंडे,मच्छिन्द्र जाधव, सुमन गंगावणे,प्रियांका गडदे, विद्या भोसले,रुपाली कांबळे, वैशाली बनसोडे, इंद्रायणी कांबळे,एकनाथ तेलतुंबडे, सुदर्शन इंगळे, डॉ. एम ए. कांबळे, शंकर रणबागले, प्रा. सिद्धार्थ पद्माकर, तेजस रणबागले, शिला सुरेश वाघमारे, पियुष वाघमारे, प्रकाश फरांदे, प्रकाश सावंत, दिलीप सावंत, रवींद्र रणबागले, सुधाकर शिलवंत, विलास कांबळे, अमित घोलप, विकास तोडकर, मंगेश डावरे, प्रकाश तासगावकर, सुनील निकाळजे,वसंत खरात,सचिन कपूर, मोहन भोसले, शहाजी वाघमारे, शिरीष कांबळे, संदेश कांबळे, सचिन मोरे, जयवंत माने, सिद्धांत बनसोडे, प्रकाश गायकवाड, माधव गंगावणे, सी.जगताप, किसन मोरे, सुनीलकुमार कांबळे, स्वराज मोटे, वाघमारे आदी उपासक व उपासिका मोठया संख्येने उपस्थित होत्या.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण यांच्या जयंतीनिमित्त फलटणमध्ये स्वच्छता अभियान; सर्व शासकीय कार्यालयांचा परिसर स्वच्छ

संबंधित बातम्या