सातारा : आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तडीपारीचे आदेश असतानाही त्याचे उल्लंघन करुन सातारा नगर परिषद परिसरात फिरताना आढळल्याने जयवंत शिवदास कांबळे (रा.गुरुवार पेठ, सातारा) याच्या विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शहर पोलिसांनी दि. 21 मे रोजी ही कारवाई केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.