25 बॉल्समध्ये 9 विकेट्स

भारतीय टीमने रचला इतिहास

by Team Satara Today | published on : 05 July 2025


भारतीय महिला क्रिकेट टीम इंग्लंड दौऱ्यावर असून शुक्रवारी तिसरी वन-डे मॅच झाली. या मॅचमध्ये भलेही टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला असेल पण या मॅचमध्ये भारतीय टीमने एक वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला आहे. हा असा वर्ल्ड रेकॉर्ड आहे जो आतापर्यंत कोणत्याही टीमला आणि कोणत्याही फॉरमॅटमध्ये करता आलेला नाहीये. 

मॅचमध्ये टॉस जिंकून प्रथम बॅटिंगसाठी मैदानात आलेल्या इंग्लंडच्या टीमने सुरुवात चांगली केली. सोफिया डंकले (75) आणि वॅट हॉज (66) रन्स केले. 15.2 ओव्हर्समध्ये इंग्लंडचा स्कोअर 137 रन्स होता. मात्र, नंतर इंग्लंडच्या टीमला गळती लागली आणि अवघ्या 25 बॉल्समध्ये 9 विकेट्स गमावल्या. 25 बॉल्समध्ये 9 विकेट्स घेण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड टीम इंडियाने आपल्या नावावर केला आहे.

25 बॉल्समध्ये 9 विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड केवळ महिला क्रिकेटच नाही तर पुरुष क्रिकेट टीममध्येही आणि कोणत्याही फॉरमॅटमध्ये झालेला नाहीये.

इंग्लंडच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट्स कमावत 171 रन्सपर्यंत मजल मारली. यानंतर 172 रन्सचं टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाच्या स्मृती मंधानाने 56 रन्स, शेफाली वर्माने 47 रन्स करत चांगली सुरुवात केली. मात्र, मधल्या फळीने चांगली साथ न दिल्याने टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडियाने 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावत 166 रन्स केल्या आणि ही मॅच पराभूत झालो.

भारतीय टीमची ऑलराऊंडर दीप्ती शर्माने 4 ओव्हर्समध्ये 27 रन्स देत 3 विकेट्स घेतला. यासोबतच दीप्तीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या 300 विकेट्स पूर्ण केल्या. हा पराक्रम करणारी दीप्ती सहावी बॉलर बनली आहे. महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात फास्ट बॉलर झूलन गोस्वामी (355) विकेट्सचा रेकॉर्ड आहे. यानंतर कॅथरीन स्किवर ब्रंट (335), एलिस पेरी (331), शबनिम इस्माइल (317) आणि अनिसा मोहम्मद (305) अशा स्थानावर आहेत. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ठाकरेंच्या मेळाव्यासाठी दिग्गज मराठी कलाकारांची फौज
पुढील बातमी
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु

संबंधित बातम्या