कोडोली गावच्या हद्दीत शेतात गळफास घेतलेल्या धनगरवाडीच्या व्यक्तीचा मृत्यू

by Team Satara Today | published on : 07 April 2026


सातारा : तालुक्यातील कोडोली गावच्या हद्दीत एक व्यक्ती शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,दि. ६ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कोडोली गावातील गट क्रमांक १४८/२ येथील रणजीत नाळे यांच्या शेताच्या बांधावर नाना नामदेव वाघमोडे (वय ५०, रा. धनगरवाडी, कोडोली, सातारा) हे गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल, सातारा येथे दाखल केले.

मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर संबंधित व्यक्ती उपचारापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले. या घटनेची नोंद शहर पोलिसांत करण्यात आली असून वैद्यकीय अधिकारी डॉ. अथर्व नलवडे यांनी याबाबत माहिती दिली.या प्रकरणी मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आझादनगर परिसरात घरकाम करणाऱ्या मोलकरणीने केली घरफोडी; दीड लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी
पुढील बातमी
साताऱ्यात जमिनीच्या वादातून लाथाबुक्क्यांनी मारहाण; एक जखमी

संबंधित बातम्या