सातारा नगरपालिकेचे 597 कोटीचे शिलकी अंदाजपत्रक सादर; सर्वसाधारण सभेची मंजुरी : ३ लाख 38 हजार 347 रुपयांची शिल्लक

by Team Satara Today | published on : 28 February 2026


सातारा  : कोणतीही करवाढ नसलेले 597 कोटी 46 लाख 77 हजार पाचशे रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक शुक्रवारी सातारा पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात सर्वसाधारण सभेच्या दरम्यान सादर करण्यात आले. अंदाजपत्रकाचे वाचन उपनगराध्यक्ष ॲड. दत्ता बनकर यांनी केले .या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अमोल मोहिते होते. यावेळी मुख्याधिकारी विनोद जळक, लेखापाल एकनाथ गवारे, उपमुख्य अधिकारी अरविंद दामले व नगरपालिकेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

या अंदाजपत्रकात आरंभीची शिल्लक 61 कोटी 86 लाख 82 हजार 847 रुपये दाखवण्यात आली असून महसुली जमा 130 कोटी 87 लाख 23000 आहे भांडवली जमा 404 कोटी 76 लाख दहा हजार दाखवण्यात आले आहे .सातारा पालिकेने उत्पन्नाच्या भागांमध्ये मालमत्ता कर व पाणी कर 34 कोटी 82 लाख मालमत्ता कराचे उत्पन्न 2 कोटी 80 लाख फी भाडे आकार 17 कोटी पाच लाख साठ हजार व्याज विलंब आकार आठ कोटी 50 लाख संकीर्ण उत्पन्न 12 कोटी 27 लाख 51 हजार महसुली अनुदान 55 कोटी 29 लाख दहा हजार व विकास कामांसाठी अनुदाने 350 कोटी 89 लाख 52 हजार दर्शविले आहे.

नगरपालिकेने खर्च या रकान्यामध्ये आस्थापना खर्च 65 कोटी 25 लाख 48000 दाखवला असून यामध्ये कर्मचारी वेतन सेवानिवृत्ती वेतन सेवा उपदान पेन्शन फरक रजा रोखीकरण इत्यादीची वर्गवारी करण्यात आली आहे .प्रशासकीय व कार्यालयीन खर्च 13 कोटी 65 लाख 77 हजार मालमत्तांची दुरुस्ती व देखभाल आठ कोटी 61 लाख 17 हजार कार्यक्रम अंमलबजावणी साठी खरेदी 22 कोटी 92 लाख 2018 चार कोटी 79 लाख 80 हजार भांडवली विकास कामे 480 कोटी 77 लाख इत्यादी खर्च दाखवण्यात आले.

सातारा पालिकेने 2026 27 चा अर्थसंकल्पामध्ये काही महत्त्वपूर्ण तरतुदी नोंदवल्याचे स्पष्ट झाले .यामध्ये पाच टक्के मागासवर्गीय खाल्ल्या निधी 58 कोटी पाच टक्के महिला बालकल्या निधी 58 कोटी पाच टक्के दिव्यांग कल्याणकारी योजना 58 कोटी घनकचरा व्यवस्थापन नऊ कोटी 58 लाख पाणीपुरवठा व्यवस्था दुरुस्ती चार कोटी 25 लाख आणि आरोग्य प्रवर्गासाठी दोन कोटी 25 लाख 50 हजार रुपये तरतूद करण्यात आली आहे .यामध्ये साथीचे रोग निर्मूलन जंतनाशके खरेदी नागरी आरोग्य केंद्रासाठी औषध खरेदी इत्यादी बाबी गृहीत धरल्या आहेत .

उत्पन्नाच्या ठळक बाबी

१ मालमत्ता कर -21 कोटी 70 लाख रुपये

२ . पाणी कर : ५ कोटी ५० लाख रुपये

३ .विशेष स्वच्छता कर - ३ कोटी 95 लाख रुपये

४ .अग्निशमन कर -85 लाख रुपये

५. इमारत भाडे व खुल्या जागा - 2 कोटी 80 लाख

६ .हातगाडा परवाना फी - 35 लाख रुपये

७. नाट्यगृह भाडे - १५ लाख रुपये

८ .विकास कर - ५ कोटी

९. प्रीमियम -१० कोटी

१० .प्रीमियम - १० कोटी

११ .महसुली अनुदाने - 55 कोटी    तीन लाख

भांडवली अनुदाने - ३५०कोटी 89 लाख

खर्चाच्या ठळक बाबी

१ .कर्मचारी वेतन भत्ते . -28 कोटी चाळीस लाख 48000

२ .निवृत्तीवेतन : १५कोटी

३ .शिक्षण मंडळ अंशदान - ३ कोटी 33 लाख

४. कार्यालयीन व प्रशासकीय खर्च :13 कोटी 65 लाख 

5. शासकीय कर्ज परतफेड एक कोटी 45 लाख

6 . आरोग्य सोयी 11 कोटी 75 लाख

7 . थोर व्यक्ती जयंती सण सत्कार समारंभ : दोन कोटी 80 लाख

8 . पर्यावरण संतुलन : 4 कोटी

9.मागासवर्गीय कल्याण निधी 58 लाख रुपये

10 .भांडवली विकास कामे - 480 कोटी 77 लाख


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भाषेचा गोडवा टिकवायला हवा, मराठी ही ज्ञानभाषा म्हणून पुढे यायला हवी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुढील बातमी
कुसुमाग्रजांच्या कवितेप्रमाणे विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा "कणा" व्हावे: यशेंद्र क्षीरसागर ; भुरकवडी शाळेत मराठी भाषा दिनानिमित्त विद्यार्थ्यांशी संवाद

संबंधित बातम्या