आझादनगर परिसरात घरकाम करणाऱ्या मोलकरणीने केली घरफोडी; दीड लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी

by Team Satara Today | published on : 07 April 2026


सातारा : शहरातील आझादनगर परिसरात घरफोडीच्या घटनेत सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी नीलम समीर मोहिते (वय ४१,रा. आझादनगर, मोळाचा ओढा,सातारा) यांनी फिर्याद दिली असून घरकाम करणाऱ्या राणी अनिता जगताप (सध्या रा. आझादनगर, मोळाचा ओढा, सातारा; मूळ रा. ठोंबरेवाडी, ता. सातारा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,ही घटना दि १६ फेब्रुवारी ते १५ मार्च दरम्यान घडली आहे.फिर्यादी नीलम मोहिते यांच्या घरातील मजल्यावरील बेडरूममधील कपाटात ठेवलेल्या पिशवीतून राणी जगतापने सोन्याचे दागिने लंपास केले.

चोरीस गेलेल्या ऐवजात सुमारे २५ ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी (अंदाजे किंमत ३५ हजार रुपये), ७.९ ग्रॅम वजनाचे चार सोन्याचे कानातले व टॉप्स (१८ हजार रुपये), १२.६९ ग्रॅम वजनाचे वेडणे (२० हजार रुपये), तसेच सोन्याचे मणी, कौल, बदाम आणि इतर लहान दागिने यांचा समावेश आहे. याशिवाय सुमारे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके (१ लाख २० हजार रुपये) देखील चोरीला गेले आहेत. एकूण अंदाजे दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा नगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह ; ४२ विषयांना गडबडीत मंजुरी; अतिक्रमण, पाणीटंचाई, स्वच्छतेवरून धुरळा
पुढील बातमी
कोडोली गावच्या हद्दीत शेतात गळफास घेतलेल्या धनगरवाडीच्या व्यक्तीचा मृत्यू

संबंधित बातम्या