मावस भावाच्या अत्याचारामुळे अल्पवयीन बहीण प्रसूत

by Team Satara Today | published on : 20 September 2024


सातारा : मावस भावाच्या अत्याचारामुळे अल्पवयीन बहीण प्रसूत झाल्याची धक्कादायक घटना वाई तालुक्यात घडली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोघे नात्याने मावस बहीण भाऊ आहेत, हे माहिती असूनही 29 वर्षीय भावाने त्याच्या सोळा वर्षीय बहिणीवर दोघांच्या घरात कोणी नसताना वारंवार अत्याचार केले. या घटना मे 2023 ते 2024 या कालावधीत घडल्या. मुलीच्या पोटात दुखू लागल्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी मुलगी गरोदर असल्याचे समोर आले. यानंतर काही महिन्यातच मुलीची प्रसूतीही झाली. तिने मुलाला जन्म दिला. यानंतर पीडितेने भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी संबंधित मावस भावाला भुईंज पोलिसांनी अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील अधिक तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ट्रॅक्टर अपघातात 12 जण जखमी; चालकावर गुन्हा
पुढील बातमी
आरल निवकणेच्या पुनर्वसनासाठी उपलब्ध जमिन दाखवण्याचा कार्यक्रम त्वरीत सुरु करा : पालकमंत्री शंभूराज देसाई

संबंधित बातम्या