कोडोली येथे एकाला लोखंडी पाईप ने मारहाण

by Team Satara Today | published on : 02 May 2025


सातारा : कोडोली तालुका सातारा येथे जमिनीच्या वादावरून एकाला लोखंडी पाईपने मारहाण केल्याची घटना दिनांक 26 एप्रिल रोजी रात्री दहा वाजता घडली आहे. विशाल रामचंद्र शेडगे रा. कोडोली यांच्या विरोधात ही तक्रार झाली. 

संजय धनवडे यांनीही फिर्याद दिली आहे. फिर्यादीचे आरोपीशी जमिनीच्या कारणावरून जुने वाद आहेत. याच कारणावरून धनवडे यांना शेडगे यांनी बोलवून त्यांच्याशी वाद घातला, तसेच त्यांना शिवीगाळ करून पाठीमागून त्यांच्या डोक्यात लोखंडी पाईपने मारहाण केली, या मारहाणीत ते बेशुद्ध पडले. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार शिंदे करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खटाव येथे टपरी चालकाला जातीवाचक शिवीगाळ
पुढील बातमी
तामजाई नगर येथे युवकाची आत्महत्या

संबंधित बातम्या