एसटी प्रवाशांना आगाऊ आरक्षणात मिळणार मोठी सूट

1 जुलैपासून योजना सुरू

by Team Satara Today | published on : 01 July 2025


मुंबई : एसटीच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या म्हणजेच 150 किमीपेक्षा जास्त प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पुर्ण तिकीट धारी प्रवाशांनाच ही सवलत मिळणार आहे. कोणतीही सवलत घेत असलेल्या प्रवाशांना तिकीट दरात 15 टक्के सवलत दिली जाणार नाही. त्याचप्रमाणए ही योजना दिवाळी व उन्हाळी सुट्टीच्या गर्दीच्या हंगामात सुरू असणार नाही.

योजनेची सुरुवात 1 जुलैपासून करण्यात येणार आहे. अधिकाधिक प्रवाशांना या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रताप सरनाईक यांनी केले आहे. त्यांनी 1 जूनला एसटीच्या वर्धापनदिनी या योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार ही योजना सर्व प्रकारच्या बससाठी लागू करण्यात येत आहे. पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठीच ही योजना लागू असेल, अशी माहिती सरनाईक यांनी दिली.

येत्या आषाढी एकादशीला व गणपती उत्सवासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. राज्यभरातून पंढरपूर येथे जाणाऱ्या नियमित बसेसचे आरक्षण प्रवाशांनी केल्यास त्यांना त्यांच्या तिकीट दरात 15 टक्के सवलत दिली जाईल. मात्र, जादा बसेस साठी ही सवलत लागू नसेल. तसेच गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी प्रवाशांना देखील आगाऊ आरक्षण केल्यानंतर या तिकिटाचा लाभ घेता येऊ शकतो, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ई-शिवनेरी बसमधील पुर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनी प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर किंवा public.msrtcors.com या एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा MSRTC Bus Reservation या मोबाईल ॲपद्वारे तिकीट आरक्षित करता येईल. ऑनलाईन माध्यमातूनही 15 टक्के सवलत मिळणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
'आयटी'वाल्या पोरांची एआय दिंडी
पुढील बातमी
पडवीमध्ये कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला

संबंधित बातम्या