सातारा नगरपरिषद, मसाप शाहूपुरी शाखेतर्फे लवकरच अभ्यासिका

by Team Satara Today | published on : 08 August 2025


सातारा : स्वराज्याची शेवटची राजधानी असणाऱ्या सातारा शहर नगरपालिकेला सुध्दा ऐतिहासिक महत्व आहे. १५० वर्षांहून अधिक परंपरा असलेल्या सातारा नगरपालिकेने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. सातारकरांना पायाभूत सुविधा देण्याबरोबरच  सांस्कृतिक, कला, साहित्य क्षेत्रासाठी उपक्रम राबवले आहेत. आता १५ ऑगस्टपासून सातारा नगरपरिषद, मसाप शाहूपुरी शाखेतर्फे लवकरच अभ्यासिका सुरु करण्यात येणार आहे. गोडोली येथील पत्रकार भवन आणि प्रतापगंज पेठ येथील महावितरणच्या कार्यालयाजवळ ही अभ्यासिका सुरु होणार असून त्यासाठी इच्छुकांनी नोंदणी करावी असे आवाहन सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

पत्रकात, सातारा नगरपालिकेने मसाप, शाहूपुरी शाखेतर्फे राज्यातील पहिला मराठी भाषा पंधरवडा राबवला आहे. त्याचबरोबर विविध सांस्कृतिक, कला उपक्रमांना सहकार्य केले आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी तसेच विविध प्रकारचे साहित्य वाचन करणाऱ्यांसाठी ही अभ्यासिका, ग्रंथालय सुरु करण्यात येणार आहे. याठिकाणी विविध नामवंत लेखकांचे साहित्य तसेच इतर वाचनीय साहित्य उपल्बध करुन देण्यात येणार आहे. गोडोली येथील पत्रकार भवन आणि प्रंतापगज पेठ येथील महावितरणच्या कार्यालयाजवळ हे ग्रंथालय सुरु करण्यात येणार आहे. पूर्व नोंदणी आवश्यक असून नोंदणीसाठी या  https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScVnJrtyeZsZlFry-7K2nuSgZ4y37rWJCZ2ZwdkLG71iR-tIQ/viewform?usp=header लिंकवर नोंदणी करावे असे आवाहन मसाप शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा येथे शाश्वत शेती दिन साजरा
पुढील बातमी
जिल्हा रुग्णालयात नर्सिंग पदवी अभ्यासक्रमास मंजुरी

संबंधित बातम्या