आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे

by Team Satara Today | published on : 08 November 2024


सातारा : आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आचारसंहिता सुरु असल्याने हॉटेल आमंत्रण व हॉटेल जांभळे बंधू स्पेशल सातारा कंदी पेढे ही दुकाने वेळोवेळी सुचना देवून, नोटीस बजावूनही सुरु ठेवली. त्याद्वारे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शुभम चंद्रकांत कदम (वय 29), सागर गणेश जांभळे (वय 38, दोघेही रा. खेड, ता. सातारा) यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हवालदार संजय खाडे यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार यादव तपास करत आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघेजण बेपत्ता
पुढील बातमी
दारू विक्रेत्यांवर कारवाई

संबंधित बातम्या